मराठा आरक्षणात इम्तियाज जलील यांनी घातला खोडा

Foto

मुंबई- मोठ्या लढाईनंतर मराठा समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. मात्र समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिले असताना आता, एमआयएम आ. इम्तियाज जलील यांनी देखील हायकोर्टात धाव घेतली आहे. जलील यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्दं करावं आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे.

 

न्या. गायकवाड यांच्या आयोगाचा अहवाल रद्द करत मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती देण्यात यावी, तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेला एसइबीसी २०१८ हायदा रद्द करण्याची याचिका जलील यांच्याकडून करण्यात आली आहे.

 

 

अॅड गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षण विरोधी याचिका

 

29 नोव्हेंबर रोजी विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला मंजूर देण्यात आली होती. यावर राज्यपाल सी विद्यासागरराव यांनी स्वाक्षरी केल्याने 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू झाला आहे. यानुसार मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र अशाप्रकारे दिलेले आरक्षण असंविधानिक आहे, त्यामुळे ते मंजूर करु नये, यासाठी अॅड. सदावर्ते यांनी राज्यपालांकडे विनंती पत्र पाठवलं होतं. मात्र राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker